इटालीमध्ये मागच्या आठवड्यात राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्यानिमिताने माझी निरीक्षणे :
१. सर्व साधारण निरीक्षण : राष्ट्रीय निवडणूक असूनही मला काहीही जाणवत नव्हतं, कसलीही धामधूम नाही, प्रचार-सभा नाहीत, लोकांमध्ये चर्चा नाहीत, पत्रकं नाहीत, पोस्टर्स नाहीत, सगळं वातावरण नेहमीप्रमाणेच ! नाही म्हणायला, प्रत्येक गावात एक मध्यवर्ती ठिकाण असतं, जिथे खूप दुकाने असतात, चर्च असतं, तिथे पोस्टर्स लावायला काही जागा राखीव असतात, तिथे दहा-बारा पोस्टर्स बघायला मिळाली, अन्यथा निवडणूक आहे हे कळणारही नाही. दूरदर्शनच्या सर्व चैनेल्सवर मात्र जोर-जोरात चर्चा होत, मुलाखती घेतल्या जात, पण प्राईम टाईममध्ये कधीच नाही, सकाळी किंवा दुपारी त्याचे प्रक्षेपण होई, मला त्या चर्चा तितक्याशा कळत नसत, पण चर्चा फार गंभीरपणे चालत. निवडणुकीसाठी मतदान रविवारी पूर्ण दिवस, व सोमवारी सकाळी ११ पर्यंत झाले.
२. पक्ष : सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे, एकंदर पंधरा पक्षांनी ही निवडणूक लढविली, त्याविषयी थोड्या विस्ताराने नंतर लिहीन.
३. मतदान : मतदानाच्या दिवशी, रविवारी, नेहमीप्रमाणे सन्नाटा होता, रविवारी साधारणत: शांत शांत असतं, दुकानं बंद असतात, लोकं घरी टि.व्ही. बघत असतात, व्हिडीओवर आवडता सिनेमा बघत आराम करतात, तसंच वातावरण या रविवारी होतं, सकाळी थोडेफार लोकं, जी चर्चमध्ये जातात (इथे १०% लोकंच चर्चमध्ये जातात, तेही रविवारी, अन्यथा २-३%) त्यांनी आपल्या गाड्या मात्र म्युन्सिपाल्टीच्या इमारतीकडे वळवून आपलं कर्तव्य पार पाडलं. बाकी इतरवेळी त्या इमारतीच्या आसपास १०-१२ गाड्या दिसत. मतदान केल्याची खूण बोटावर लावण्य़ाची पद्धत नाही. प्रत्येकाजवळ स्वत:चे इलेक्ट्रोनिक कार्ड असतं, गोंधळ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.