त्याला आम्ही लहान मोठ्या गल्ली-बोळातून फिरवताना रस्त्यावर बसून भाजी विकणारे पाहीले, त्यांच्या कडे पहात तो म्हणाला, की भारतीय लोकांकडे उद्द्योग-प्रेरणा (entrepreneurship) खूप चांगली आहे, त्याला त्याच्या इटालीच्या जीम मध्ये योगा-आयर्वेद-हर्बल मेडिसीन्स-केरलीयन मसाज आदी सुरू करायचे आहे. तो मूळात मार्केंटींग मधला हुशार माणूस, आम्ही त्याच्या गाठी-भेटी योगा-टिचर, आयुर्वेदीक डॊक्टर्स यांच्याशी घालून दिल्या. त्याला त्यांच्याशी बोलण्यात रस नव्हता, हे सर्व इटालीमध्ये विकण्यासाठी ते काय आहे हे जाणण्यात रस नव्हता, ते करण्यासाठी किती जागा लागेल, किती पैसा लागेल, किती माणसं लागतील, त्या माणसांकडे काय काय असायला हवं, हेच त्याला जाणून घ्यायचं होतं.
आता थोडं भारताविषयी, त्याचं किंवा एकूणच युरोपीयन लोकांचं (बिझनेस मधल्या) मत आहे, नाही त्यांना तशी खात्री आहे कि भारत एक ना एक दिवस सुपर-पॊवर होणार, अमेरिके-प्रमाणे सर्व जगावर राज्य करणार. या माणसाच्या मते आज जवळपास ३०% लोकांचे मासिक उत्पन्न हजार युरो इतकं आहे, (हजार युरो म्हणजे ६५००० रूपये), त्याच्या अंदाजाने अजून पाच वर्षात ५०% लोक महिना हजार युरो कमवायला लागतील, म्हणजे पन्नास कोटी लोक श्रीमंत होतील, पन्नास कोटी म्हणजे किती मोठा गि-हाईक! कारण युरोपमधील आजचे सरासरी मासिक उत्पन्न दिड-हजार युरो आणि पुर्ण युरोपमध्ये पंचविस कोटी लोक. हे प्रचंड मार्केट हेच म्हणे भारताचं शक्ति-स्थान! निव्वळ भांडवल शाही नजर,
पण भारत सुपर-पॊवर होणार हे काही मला पचनी पडत नाहीय, कारण यावेळी मुंबई-ठाण्यात फिरताना मला मात्र निराशाच पदरी पडली. Quality of life, भारतातील माणसं किड्या-मुंगी सारखी जगतायत, युरोपमधील गरिबातील गरीब माणूस ही ज्या डिग्नीटी ने राहतो, त्या पद्धतीने जोपर्यंत सामान्य माणूस जगणार नाही, तोपर्यंत... जोपर्यंत गरीब माणूस सुखाचा घास शांतपणे खाणार नाही, तोपर्यंत... जोपर्यंत भारतातील श्रीमंत माणूस टैक्स पलिकडे जाउन गरीब माणसाशी आपलं उत्पन्न शेअर करणार नाही (म्हणजे गरीब-श्रीमंत यांच्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर १:१०, अगदी १:२५ होणार नाही) तोपर्यंत... अगदी तोपर्यंत भारत सुपर-पॊवर होऊ शकणार नाही, ज्या देशात भूकबळी होत असतील, लोकं रस्त्यावर उघड्यावर मरत असतील, त्या देशात कितीही टाटा-बिर्ला-अंबानी असतील, तो देश सुपर-पॊवर सोडा, प्रगत म्हणण्याच्या लायकीचाही नाही. हे माझं म्हणणं त्याला अगदी पटलं !
मुंबई-ठाण्यात फिरताना जाणवलं की क्वालीटी ऒफ लाईफ़ इज डिटीओरेटेड मोअर न मोअर! रस्त्यावर धड चालता येत नाहीय, सुंदर मोकळी हवा, प्रदूषण रहीत हवा, हे स्व्प्न होत चाललंय, लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने झालेल्या रजकारणाने, पैसाकारणाने होती नव्हती ती आशा ही धुळीत मिळत चाललीय, फालतू मुद्यांवरून धुमाकूळ घालून जीवन-मरणाचे प्रश्न विसरायला लावले जाताहेत.... कधी मिळणार क्वालीटी ऒफ लाईफ सामान्य माणसाला ?
अपूर्ण ...
1 comments:
It is remarkable, very amusing message
Post a Comment